गेल्या काही दिवसांपासुन राज्यातील अनेक शहरामधील कच-याचा प्रश्न कठीण होत चालला आहे. ज्या शहरालगतच्या गावात कचरा टाकला जातो त्या गावामधील ग्रामस्थ आपल्या गावात कचरा टाकण्यास विरोध करत असल्याने व ते आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने प्रशासन व ग्रामस्थ यांच्यात अनेक बैठका होवूनही कचरा प्रश्नावर तोडगा काही निघत नाहीये. एकंदरीत विचार केला तर ग्रामस्थांची भूमिकाही न्याय्य आहे. शहरातील कचरा त्यांच्या परिसरात टाकून त्यांच्या निरोगी जीवन जगण्याच्या अधिकारावर आपण अवडंबर आणतोय. त्यांना सुद्धा गरिमापूर्ण जीवन जगण्याचा घटनादत्त अधिकार आहे. मग या कचा-याच्या भीषण प्रश्नावर तोडगा काढायचा कसा..? एकच उपाय आहे... “ वेंगुर्ला पॅटर्न”..!!!
मध्यंतरी पुण्यात वसंत व्याख्यानमालेत वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी श्री.रामदास कोकरे यांचे घनकचरा व्यवस्थापन याविषयी व्याख्यान झाले. श्री. कोकरे यांनी प्रशासन व लोकसहभागातून संपूर्ण वेंगुर्ला शहर व परिसर कचरामुक्त केलेच नाही तर गावातून डम्पिंगग्राउंड सुद्धा हद्दपार केले. शहरातील कचरा प्रश्न सोडविण्यासाठी हा पॅटर्न राबवला पाहिजे. वेंगुर्ल्यात नेमकं काय केलं हे जाणून घेऊया.. नगरपालिकेने सर्वप्रथम शहरात प्लास्टिकबंदी केली, प्रसंगी कठोर भूमिका घेतली. प्लास्टिकबंदी केल्याने शहरातील निम्मा कचरा कमी झाला. जनतेने आपल्या घरात निर्माण होणा-या कच-याचे 4 भागात वर्गीकरण केले.- ओला, सूका, कागद, प्लास्टिक/काच बाटली, ई. शहरातील ओल्या कचऱ्यावर १०० टक्के प्रक्रिया शक्य आहे, त्यातून बायोगँस,बायोसीएनजी, वीज, खत तयार करण्यात येते. राज्यात पुण्यासह अनेक ठिकाणी ओल्या कच-यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प आहेत, पण ते पुरेशे व पूर्ण क्षमतेने चालत नाही. त्याकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास ओल्या कचऱ्याचा प्रश्न सुटू शकतो. त्याचप्रमाणे कागदाचा १०० टक्के पुनर्वापर होवू शकतो.
वेफर्सची पाकिटे, दूध पिशवी, चॉकलेटचे रेपर्स, थर्माकोल, ई कच-याचा सुद्धा पुनर्वापर होवू शकतो. वेंगुर्ल्यात या प्रकारचा कचरा बारीक करून तो २० टक्के प्रमाणात उकळत्या डांबरात मिसळून रस्तेनिर्मिती केली जाते. प्लास्टिक, काचेच्या बाटल्या भंगारात विकून त्यातून पैसा मिळवला जातो. त्यामुळे प्लास्टिक व थर्माकोल कच-याची समस्या १०० टक्के सुटली. झाडाच्या तुटलेल्या फांदया, शेतातील काडीकचरा यापासून कांडीकोळसा तयार करण्यात येतो, ज्याचा वापर ग्रामीण भागात इंधन म्हणून करण्यात येतो. त्यामुळे सरपणासाठी परिसरातील झाडा-झुडपांची कत्तल घटल्याचे त्यांनी सांगितले. वेंगुर्ल्यात या पद्धतीने कचरा व्यवस्थापन करून प्रतिमाह सुमारे दीड लाख रुपये कमविल्या जाते. तेथील पूर्वीच्या डम्पिंगच्या जागेवर आज छानशी बाग फुलवली आहे.
जनतेचा सहभाग महत्वाचा
कचरा प्रश्नाबाबत फक्त प्रशासनाला जबाबदार ठरविण्यापेक्षा जनतेने सुद्धा कमीतकमी कचरा निर्माण होईल याचा विचार करावा. आपल्या घरातील कच-याचे योग्य पद्धतीने वर्गीकरण करून ओला कचरा, निर्माल्य घरातच जिरवून त्यातून सेंद्रिय खत तयार करावे. किराणा माल घरी आणल्यावर त्यातून उरणारा कागद, पाकिटे फेकुन न देता पुन्हा वापरता येईल. या सर्व बाबी प्रभावीपणे अंमलात आणल्या तर शहराचा कच-याचा प्रश्न निश्चितपणे सुटू शकतो.
स्वच्छतेचा हा वेंगुर्ला पॅटर्न जाणून घेण्यासाठी खालील ध्वनिचित्रफीत आपण बघू शकतो.
ऋषिराज तायडेमध्यंतरी पुण्यात वसंत व्याख्यानमालेत वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी श्री.रामदास कोकरे यांचे घनकचरा व्यवस्थापन याविषयी व्याख्यान झाले. श्री. कोकरे यांनी प्रशासन व लोकसहभागातून संपूर्ण वेंगुर्ला शहर व परिसर कचरामुक्त केलेच नाही तर गावातून डम्पिंगग्राउंड सुद्धा हद्दपार केले. शहरातील कचरा प्रश्न सोडविण्यासाठी हा पॅटर्न राबवला पाहिजे. वेंगुर्ल्यात नेमकं काय केलं हे जाणून घेऊया.. नगरपालिकेने सर्वप्रथम शहरात प्लास्टिकबंदी केली, प्रसंगी कठोर भूमिका घेतली. प्लास्टिकबंदी केल्याने शहरातील निम्मा कचरा कमी झाला. जनतेने आपल्या घरात निर्माण होणा-या कच-याचे 4 भागात वर्गीकरण केले.- ओला, सूका, कागद, प्लास्टिक/काच बाटली, ई. शहरातील ओल्या कचऱ्यावर १०० टक्के प्रक्रिया शक्य आहे, त्यातून बायोगँस,बायोसीएनजी, वीज, खत तयार करण्यात येते. राज्यात पुण्यासह अनेक ठिकाणी ओल्या कच-यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प आहेत, पण ते पुरेशे व पूर्ण क्षमतेने चालत नाही. त्याकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास ओल्या कचऱ्याचा प्रश्न सुटू शकतो. त्याचप्रमाणे कागदाचा १०० टक्के पुनर्वापर होवू शकतो.

9404141216